फ्लेमिंगोनंतर उजनीत पट्टकदंब हंसांचे आगमन | पुढारी

फ्लेमिंगोनंतर उजनीत पट्टकदंब हंसांचे आगमन

  • दिमाखदार चालीने ठरतात पक्षिप्रेमींचे आकर्षण

  • हिमालयाच्या मान सरोवरातून थेट उजनीत

पळसदेव : प्रवीण नगरे : हिमालयाच्या मान सरोवरातील नितळ पाण्याचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे तसेच तिबेटच्या विविध जलस्थानांवर मूळ वास्तव्याला असणारे पट्टकदंब हंस जिल्ह्यातील वरदायिनी असलेल्या उजनीवर हिवाळी पाहुणे म्हणून येऊन दाखल झाले आहेत. उजनी जलाशयाच्या काठावरील हिरवळीवर हे नजाकतदार हंस दिमाखदार चालीने वावरताना पक्षिप्रेमींचे आकर्षण ठरत आहेत.

अभिनेते नाना पाटेकर गदिमा पुरस्काराचे मानकरी

उजनी जलाशय विविध पक्ष्यांनी आता गजबजू लागला आहे. त्यात फ्लिमिंगोपाठोपाठ आता पट्टकदंब हंस आशा दुर्मिळ आणि देखण्या पक्ष्याची भर पडली आहे. या पक्ष्यांचे पांढरे शुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्टे या हंसांना ओळखण्याच्या खुणा आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेल्या या हंसाची चोच गुलाबी आहे व त्याचे पाय नारिंगी-पिवळे आहेत. राखी रंगाच्या पंखांवर काळे पट्टे आहेत. शेपटीचे मूळ व टोक पांढरे शुभ्र असून यांना कादंब हंस या नावानेही ओळखतात. इंग्रजीत बार हेडेड गूज म्हणतात.

बारामती बॅंकेसाठी राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर

तीन महिन्यांच्या उजनीतील वास्तव्यानंतर हे हंस शीतकाळ सरतेवेळी पुन्हा हिमालयाकडे कूच करतात. पाण्यातून मुक्त झालेल्या हिरवळीवर हे पक्षी चरत असतानाचे दृश्य मनोहारी वाटते. पहाटेच्या वेळी हे हंस अंग.. अंग.. असा आवाज करीत एकमेकांना साद घालतात व ऐकणार्‍यांना तो आवाज कर्णमधुर वाटतो.

लग्न कॅटरीनाचं पण मीम्स सलमानवर व्हायरल

वास्तव्याबद्दल साशंकता

दरवर्षी उजनी जलाशय परिसरात अनेक प्रकारच्या परदेशी बदकांचे आगमन होते. त्यापैकी प्रामुख्याने दरवर्षी न चुकता ठरलेल्या वेळेत म्हणजेच हिवाळ्याच्या प्रारंभी येणारे पट्टकदंब हंस उजनी जलाशयातील पळसदेव परिसरात येऊन दाखल झाले आहेत. दरवर्षी हे पक्षी फेब—ुवारी-मार्चपर्यंत वास्तव्यास असतात. मात्र अवेळी पडणारा पाऊस, तसेच वातावरणातील बदलामुळे यावेळी हे हंस पक्षी किती दिवस येथे राहतील याबाबत साशंकता आहे.

ओबीसी आरक्षण : छगन भुजबळ म्हणाले, हा तर ५४ टक्के लोकसंख्येवर अन्याय

“नव्वदच्या दशकापर्यंत हे हंस पक्षी उजनी जलाशयासह निरा व भीमा नदीच्या पात्रात, तसेच जिल्ह्यातील अनेक तलावांवर वावरताना दिसून येत होते. मात्र, सध्या या नद्यांना प्रदूषणाने ग्रासल्यामुळे या परदेशी पक्ष्यांनी तिकडे पाठ फिरवली आहे. सकाळ- संध्याकाळच्या वेळी चरण्यात दंग असलेले हंस पक्षी दुपारच्या वेळी काठावरील पाणवनस्पतींच्या आडोशाला विश्रांती घेत असतात. अशा बेसावध वेळी या पक्ष्यांची शिकार होण्याची शक्यता असते.”
                                                                                                                       – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

 

LPG Cylinder : घरगुती सिलिंडर वजनात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा विचार

Back to top button