LPG Cylinder : घरगुती सिलिंडर वजनात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा विचार | पुढारी

LPG Cylinder : घरगुती सिलिंडर वजनात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा विचार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : घरगुती गॅस सिलिंडर ( LPG Cylinder) हा आपल्‍या सर्वांच्‍याच जगण्‍यातला अभिभाज्‍य भाग झाला आहे. यासंदर्भातील कोणतीही माहिती आपणासाठी महत्त्‍वपूर्ण ठरते. आता केंद्र सरकार घरगुती सिलिंडरच्‍या वजनासंदर्भात ( LPG Cylinder) एक महत्‍वपूर्ण निर्णय घेणार आहे. घरगुती सिलिंडर हे सध्‍या १४.२ किलोग्रॅम वजनाचे येते. त्‍यामुळे महिलांना  सिलिंडर उचलताना कसरत करावी लागते.

LPG Cylinder : महिलांना सहज उचलता यावे इतकेच वजन ठेवण्‍याचा विचार

घरगुती गॅस सिलिंडर महिलांना उचलता येत नाही, असे नाही. मात्र याचे वजन थोडे कमी केले तर महिलांना यांचा निश्‍चित फायदा होईल. तसेच अनेक महिलांना अतिरिक्‍त वजन उचलल्‍यामुळे त्रास होण्‍याचाही धोका असतो. त्‍यामुळे घरगुती गॅस सिलिंडर एका जागेवरुन हलवणे ही कसरत ठरते. या सर्व बाबींचा विचार करुन सरकार लवकरच घरगुती गॅस सिलिंडरचे वजन कमी करण्‍याबाबत निर्णय घेवू शकते. महिलांना सहज हाताळता येईल इतके वजनाचे घरगुती गॅस सिलिंडर असावे, याचा विचार सध्‍या सुरु असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

घरगुती गॅस सिलिंडर हाताळताना महिलांना होणारा त्रास लक्षात घेता त्‍याचे वजन कमी करावे. तसेच अन्‍य पयार्यांवरही सरकार विचार करत आहे, अशी माहिती नुकतीच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्‍यसभेत दिली होती.

घरगुती सिलिंडरच्‍या वजनाबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी एका सदस्‍याने राज्‍यसभेत केली होती. यावेळी पुरी यांनी म्‍हटलं होते की, महिला आणि मुलींना जास्‍त वजनाचे घरगुती सिलिंडर उचलताना होणार त्रासबाबत आम्‍ही विचार करत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ वरुन कमी करुन पाच किलो करता येईल का?. तसेच यावर अन्‍य कोणता पर्याय राबवता येईल याबाबत सरकार विचार करत असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचलं का? 

 

Back to top button