पारगड, सामानगडासाठी किती निधी दिला? | पुढारी

पारगड, सामानगडासाठी किती निधी दिला?

नूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या राजघराण्याचा सन्मान करत खासदारकीची संधी दिली, मान दिला, निधीही दिला; पण तुम्ही कृतघ्नच निघालात, अशी टीका करत शासनाने गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीतील किती निधी पारगड व सामानगडांच्या संवर्धनासाठी दिला याचे उत्तर द्या. मग विकासकामांवर बोला, असा हल्लाबोल आ. राजेश पाटील यांनी केला. नूल, हसूरचंपू, बसर्गे मतदारसंघात खा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते.

खा. मंडलिक म्हणाले, या निवडणुकीत विरोधक विकासाच्या मुद्द्यावर न बोलता हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नसल्याने भावनिकतेचा मुद्दा पुढे करीत आहेत. विरोधकांच्या हुकूमशाही वृत्तीवर मंडलिक यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, ते गृहराज्यमंत्री नाहीत, याचे भान विसरलेत. आज आम्ही सत्तेवर आहोत, याची नोंद त्यांनी घ्यावी, असा इशारा खा. धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, संतोष पाटील, सरपंच भारती रायमाने, जयश्री तेली, जयसिंग चव्हाण यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रकाश चव्हाण, हेमंत कोलेकर, सुरेश कुराडे, कल्लापा खोत, सरपंच भारती रायमाने, योगीता संघाज, संतोष तेली, सागर कुराडे, जि.प. सदस्य अनिता चौगले, वसंतराव चौगले, विकास मोकाशी, प्रकाश पताडे, उपस्थित होते. स्वागत जयकुमार मुनोळी यांनी केले. महाबळेश्वर चौगले यांनी आभार मानले. स्व. श्रीपतराव शिंदे यांचे पुतणे, माजी उपसरपंच अजित शिंदे यांनी खा. मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला.

Back to top button