जळगावात उष्माघाताने 63 शेळ्यांच्या मृत्यू | पुढारी

जळगावात उष्माघाताने 63 शेळ्यांच्या मृत्यू

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथे 63 मेंढ्या उष्माघाताने मरण पावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन  जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत महिती दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन निघावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच दुपारच्या वेळेस तापमान हे 45 ते 47 अंशवर राहते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावात दुपारच्या वेळी 144 कलम लागू केले आहे.

जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमान 45 ते 47 अंशावर जाऊन पोहोचले आहे. वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ शेती पिकांना बसतो आहे, असे नव्हे तर मुक्या जनावरांवर त्याचा परिणाम होवू लागला आहे. वाढत्या उष्माघातामुळे शेळ्या मरण पावल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

या घटनेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसान ग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदतीचे आव्हान केले आहे. स्थानिक पशू चिकित्सक रामदास जाधव यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. यामध्ये मेंढ्यांचा मृत्यु उष्माघाताने झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : 

Back to top button