अंबानींना मागे टाकून अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत | पुढारी

अंबानींना मागे टाकून अदानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकून अदानी समूहाचे गौतम अदानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक बनले आहेत. ‘ब्लूमबर्ग’च्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

आजवर अदानी हे आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत होते. गेल्या आठवड्यात मुकेश अंबानी यांची संपत्ती 91 अब्ज डॉलर्स, तर अदानी यांची संपत्ती 88 अब्ज डॉलर्स होती. गौतम अदानी यांच्या संपत्तीत यंदा जानेवारी ते या क्षणापर्यंत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 14.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

अदानी यांची संपत्ती 18 मार्च 2020 रोजी अवघी 4.91 अब्ज डॉलर्स होती. एप्रिल 2020 नंतर त्यात वाढ होत गेली. अठरा महिन्यांत त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स 5-6 पटीने वाढले आहेत. या कालावधीत अदानींच्या संपत्तीत तब्बल 1,808 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्सचा सौदी अरेबियाशी करारभंग झाल्याने रिलायन्सचे शेअर 12 टक्क्यांनी खाली आले. गुरुवारीही त्यात 1.48 टक्के घसरण होऊन ते 2 हजार 350 रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे, याच कालावधीत अदानी समूहाची शेअर बाजारात चांदी होती.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : फटाके वाजवून साजरा केला नातीच्या जन्माचा आनंद..

Back to top button