Cannes Festival : ‘कान्स’मध्‍ये वर्चस्व गाजवणार्‍या ‘ऑल वी इमॅजिन इज लाइट’ ची कथा आहे तरी काय?

Cannes Festival : ‘कान्स’मध्‍ये वर्चस्व गाजवणार्‍या ‘ऑल वी इमॅजिन इज लाइट’ ची कथा आहे तरी काय?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मानाच्‍या ७७ व्या कान्‍स चित्रपट महोत्‍सवात 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या भारतीय चित्रपटाने इतिहास रचला आहे. पायल कपाडियाच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाने या महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकला आहे. जाणून घेवूया 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'ची कथा काय आहे…(Cannes Festival)

कान्स फेस्टिव्हल २०२४

  • नुकताच ७७ व्या कान्‍स चित्रपट महोत्‍सव पार पडला
  • 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या भारतीय चित्रपटाने ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावला
  • या चित्रपटात तीन महिलांची कथा दाखवली आहे

ग्रॅमी आणि ऑस्कर सारखे पुरस्कार जिंकल्यानंतर आता भारतीय चित्रपटाने कान्समध्‍ये आपलं वर्चस्‍व गाजवलं आहे. 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' या  चित्रपटाने कान्स २०२४ मध्ये दुसरा सर्वोच्च पुरस्‍कार पटकावला आहे.

चित्रपटाची कथा काय सांगते ?

'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' (All We Imagine As Light) चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, यात प्रभा आणि अनु नावाच्या दोन परिचारिकांची (नर्स) कथा दाखवली आहे. या दोघीही मल्याळी आहेत. त्‍या वास्‍तव्‍यास मुंबईत आहेत. दोघेही आपापल्या नात्यात संघर्ष करत आहेत. याशिवाय पार्वती नावाच्या महिलेची कथाही चित्रपटात दाखवण्यात आली आहे.  स्त्रीसाठी आज समाजात काय स्थान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या तीन महिलांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

या तिघी त्यांचे संपूर्ण आयुष्य इतरांची मदत आणि काळजी घेण्यात घालवतात. त्या बदल्यात त्यांना काय मिळते? तर थोडे पैसे, थोडे स्वातंत्र्य किंवा प्रशंसा. स्त्रीवादी विचारसरणीवर भर देणारा हा चित्रपट सुंदरपणे विणला गेला आहे. याच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Cannes Festival

काय म्हणाल्या पायल कपाडिया?

'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' चित्रपट बनवणाऱ्या पायल कपाडिया एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या की, "भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळण्यासाठी 30 वर्षे का लागली?  भारतात अनेक दृष्टीकोन आहेत. हे चांगले की वाईट असे मी म्हणत नाही, पण मुद्दा हा आहे की परदेशात ते नीट कळत नाही. येथे विविधता आहे. प्रत्येक राज्याचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. केवळ पाश्चिमात्य लोकांना प्रभावित करण्यासाठी चित्रपट बनवण्याचा त्यांचा हेतू नाही.

पायल कपाडिया
पायल कपाडिया

बॉलिवूडनेही कौतुक केले

30 वर्षांनंतर या चित्रपटाला भारतातून कान्समध्ये जाण्यासाठी नामांकन मिळाले आणि चित्रपटाने ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकला. या चित्रपटात दिव्या प्रभा, कणी कुश्रुती आणि छाया कदम यांसारख्या अभिनेत्री दिसल्या होत्या. चित्रपटाने पुरस्कार पटकावल्यानंतर या टीमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी आणि रिचा चढ्ढा या बॉलिवूड अभिनेत्रींनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news