संधी मिळाली तर भारतातही सहकार्य | पुढारी

संधी मिळाली तर भारतातही सहकार्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘अमेरिकेच्या तुलनेत भारत संशोधनात मागे नाही. दोन्ही देशांमध्ये हुशार वर्ग अधिक आहे. परंतु, आपल्याकडे गुंतवणूक, पायाभूत सुविधा कमी आहे. त्या तुलनेत अमेरिकेत पायाभूत सुविधा, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, संशोधनाला गती मिळते. मला भारतासाठी काम करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच सहकार्य करेन,’ अशी भावना मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचे प्रमुख संशोधक पुणेकर डॉ. मिहिर मेटकर यांनी व्यक्त केली.

ParamBir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

पुण्यातील बायो इन्फर्मेटिक्स विषयात पीएचडी केलेले आणि शुक्रवारी (दि. 26) वयाची 34 वर्षे पूर्ण करणारे डॉ. मिहिर अमेरिकेत मॉडर्ना या लसनिर्मिती कंपनीत संशोधक म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीने स्वतःचे पेटंट मिळविले. त्यात प्रमुख संशोधक म्हणून डॉ. मिहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांची आई डॉ. अंजली यांच्या भारत इंग्लिश स्कूलच्या 1978 सालच्या दहावीच्या तुकडीतील मित्र-मैत्रिणींनी डॉ. मिहिर यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांचे वडील डॉ. अशोक मेटकर, युवराज शहा, माजी पोलिस अधिकारी सुरेंद्रनाथ देशमुख, दीपक सोनावणे आदी उपस्थित होते. त्यापूर्वी डॉ. मिहिर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

TMC : मेघालयमध्‍ये काॅंग्रेसला भगदाड ! १२ आमदारांनी केला तृणमूलमध्ये प्रवेश

डॉ. मिहिर म्हणाले, ‘संशोधक दोन्ही देशांमध्ये आहेत. त्यामुळे सुविधा दिल्या की संशोधन होईल. अमेरिकेत प्रगत विज्ञान असून, त्यात नवे तंत्रज्ञान येते. नवी गुंतवणूक होते. भारताने त्याबाबत सकारात्मक दृष्ट्या पाहायला हवे. त्यामुळे भारतात संशोधनाला खूप मोठी संधी आहे. मॉडर्ना कंपनीकडून भविष्यात विकसित करण्यात येणार्‍या अन्य आजाराला प्रतिबंध करणार्‍या लसींमध्ये ‘एम-आरएनए’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्याआधारेच लसनिर्मिती केली जाणार आहे.’

‘माझे संशोधन जैवमाहिती शास्त्रांमध्ये आहे. त्यामुळे त्याच विषयांमध्ये मी कंपनीत संशोधक म्हणून भूमिका पार पाडतो. जगभरात तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये जिवंत किंवा मृत विषाणूंचा वापर करण्यात आला आहे. मात्र, मॉडर्ना कंपनीच्या लसींमध्ये या विषाणूजवळ जाण्याची गरज नाही, तर कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेले ‘एम-आरएनए’ (मेसेंजर आरएनए) या तंत्रज्ञानाच्या आधारे ही लसनिर्मिती करण्यात आली.

सीएसकेची रिटेन पॉलिसी आली समोर; तीन भारतीय खेळाडू रिटेन करण्याची शक्यता

मुलाच्या साधेपणाचा अभिमान

‘पुणेकर संशोधक म्हणून त्याचा होत असलेला गौरव आणि त्याच्या संशोधनाचा आम्हाला अभिमान वाटतो. पेटंट मिळाल्यानंतर त्याचे नाव झळकले, त्या वेळी आनंदाला पारावर उरला नव्हता. आम्हाला त्याच्या साधेपणाचा आणि कामाचा अभिमान वाटतो,’ अशा भावना डॉ. मिहिर यांची आई डॉ. अंजली आणि वडील डॉ. अशोक मेटकर यांनी व्यक्त केल्या.

माझे छोटेसेच काम…

‘मॉडर्नात सध्या विविध प्रकारच्या आजारांवर प्रतिबंधात्मक लसनिर्मितीचे काम सुरू आहे. माझा ‘एम-आरएनए’ या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. त्या लसनिर्मितीमध्ये ‘एम-आरएनए’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे त्याचा अनेकांना फायदा होईल. मॉडर्नाच्या लसनिर्मितीमध्ये माझे छोटेसे काम आहे. तेच काम मी केले आहे. अन्य संशोधकांनी त्यांचे काम केले आहे,’ असे डॉ. मिहिर म्हणाले.

Dr. meehir felicitated in Pune

Back to top button