सोलापूर : केम येथे गायीला दुग्धाभिषेक करून दूधदर वाढीसाठी आंदोलन | पुढारी

सोलापूर : केम येथे गायीला दुग्धाभिषेक करून दूधदर वाढीसाठी आंदोलन

केम: पुढारी वृत्तसेवा: गाईला दुग्धाभिषेक करून दूधदर वाढीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी गायीच्या दुधाला ४० रूपये आणि म्हशीच्या दुधाला ७० रूपये दर देण्यात यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपतालुकाप्रमुख हरिभैय्या तळेकर यांनी दिला.

यावेळी कृष्णाई दूध डेअरीचे चेअरमन कालीदास तळेकर म्हणाले की, सध्याची दुष्काळ जन्य परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेतीचा जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा मोठा आधार ठरणार आहे. परंतु, वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गाईच्या दुधाला ४० रूपये व म्हशीच्या दुधाला ७० रूपये दर मिळाला, तरच शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर येणार आहे.
किरण तळेकर म्हणाले की, वैरण,व पशुखादयाचे भाव वाढले पण शासनाने मात्र दूधाचे दर वाढविले नाहीत. शेतकऱ्यांचा प्रपंच दुध धंदयावर चालतो. पण आता शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूधाला भाव मिळालाच पाहिजे. रमेश तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कुंडलिक देवकर, हनुमंत देवकर, ज्ञानेश्वर देवकर, सुरेश देवकर, गणेश देवकर, दिनकर सुरवसे, विष्णू यादव, राजेंद्र देवकर, दादा सातव, मधुकर यादव, संभाजी गुरव, दादा पळसकर, विठ्ठल पळसकर, महादेव पळसकर, हनुमंत पळसकर, चेतन साखरे, सुभाष पळसकर, जोतिराम पळसकर, सचिन बिचितकर, रेवणनाथ बिचितकर, बाळासाहेब अवघडे, राजेंद्र कांबळे, भाऊसाहेब गुटाळ, समाधान चव्हाण, नागेश देवकर, अजित तळेकर, नागनाथ तळेकर, समीर तळेकर, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button