सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

अपघातात युवकाचा मृत्यू
अपघातात युवकाचा मृत्यू

करमाळा: तालुका प्रतिनिधी केडगाव तालुका करमाळा येथील पैलवान अरबाज महंमद उर्फ दादाभाई पठाण (वय 24) याचा मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करमाळा येथे असलेल्या चुलत बहिणीचा हळदी समारंभ आटोपून साडे मार्गे गावाकडे चालला होता. साडे ते कुंभेज चौफल्यावर तो आला असता त्याची बुलेट क्रमांक एम एच 42 ए जे 3434 चा घसरून अपघात घडला. यावेळेस त्‍याच्या डोक्‍यास मार लागून तो जागीच ठार झाला.

तिच्या बहिणीचा (आज ता.15) मे रोजी झरे फाटा येथील राधेशाम मंगल कार्यालयात सायंकाळी सात वाजता विवाह होता. त्या विवाहापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. अरबाज पठाण याच्या पश्चात आई, वडील, बहिणी असा परिवार आहे. तो एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत करमाळा पोलिस स्‍टेशनमध्ये अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार राजेंद्र कावळे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news