देहदान, अवयवदानात सोलापूरकरांचे दातृत्त्व भारी !

देहदान, अवयवदानात सोलापूरकरांचे दातृत्त्व भारी !
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात देहदान-अवयवदानाबद्दल जागरुकता वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात 13 जणांनी परराज्यातील रुग्णालयात जाऊन प्रत्यारोपण केले, तर इतर नऊ जणप्रत्यारोपण करण्याच्या प्रतीक्षेत रुग्णालयात दाखल झाले आहेत. महिन्याला एक-दोन देहदानही करण्यात येत आहेत. देहदान-अवयवदानाच्या सामाजिक कार्यात मुंबई-पुण्यानंतर सोलापूर राज्यात अग्रेसर ठरत आहे.

वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी मृतदेहाची गरज असते तर अवयवयदानाने एखाद्या व्यक्तीला पुनर्जन्म मिळतो. ही दातृत्वाची चळवळ जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून सुरू असली तरी गत दोन वर्षांत या चळवळीला मोठी गती आली आहे. समज-गैरसमजामुळे देहदानाला अडसर येत असलातरी आतापर्यंत शासकीयसह अश्विनी महाविद्यालयात 47 ते 48 जणांचे देहदान झाले आहे. सोलापुरात ब्रेन डेडनंतर सर्वच महत्त्वाचे अवयव देऊन काही जणांनी या सामाजिक कार्यात आदर्श निर्माण केला आहे. यकृत प्रत्यारोपणाबाबत ही चळवळ गतिमान झाली आहे.

वर्षभरात 60 ते 65 जणांच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

ज्यांचे दोन्ही यकृत निकामी ठरत आहेत, अशा घरातील व्यक्तींसाठी घरातूनच यकृत दान दिले जात आहे. तामिळनाडू राज्यातील कोईमतूर येथील केएमसीएच रुग्णालयात गत महिन्यांत 13 जणांनी यकृत प्रत्यारोपण केले तर इतर नऊ जण प्रत्यारोपण करण्याच्या प्रतीक्षेत रुग्णालयात दाखल आहेत. वर्षभर याठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 60 ते 65 जणांच्या यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news