हार्दिक पांड्या म्हणतो, कस्टम विभागाने माझी घड्याळे जप्त केलीच नाहीत | पुढारी

हार्दिक पांड्या म्हणतो, कस्टम विभागाने माझी घड्याळे जप्त केलीच नाहीत

पुढारी ऑनलाईन डेस्क

कस्टम विभागाने माझी घड्याळे जप्त केलेच नाहीत. मी स्वत: कस्टम ड्युटी भरण्यासाठी गेला होता. या घड्याळांची किंमत पाच कोटी नसून दीड कोटी आहे, असा खुलासा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने केला आहे.  हार्दिक पांड्या जवळील दोन घड्याळे जप्त करण्‍यात आल्‍याचे वृत्त हाेते. ही माहिती चुकीचे असल्‍याचे पांड्या याने म्‍हटलं आहे.

हार्दिक पांड्या याने काय म्हटलं?

१५ नोव्हेबर रोजी दुबईतून परत आल्यानंतर मी स्वत: कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेलो होतो. आणि त्यांना सगळ्या वस्तूंसंबंधी माहिती दिली. कारण ते कस्टम ड्यूटी भरु शकतील. अधिकाऱ्यांनी मागितलेल्या सर्व कागदपत्रे दिली आहेत या घटनेला घेऊन चुकीची माहिती समोर येत आहेत. अस हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.

घड्याळाची किंमत दीड कोटी आहे. माझ्यावर लावलेले सगळे आरोप चुकीचे आहेत. मी कस्टम अधिकाऱ्यांनी चौकशीला सहकार्य केलं आहे, असेही हार्दिक पांड्याने स्‍पष्‍ट केले आहे.

भारताची कामगिरी निराशाजनक

दुबईत झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती. यावेळी विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार मानल्या जाणार्‍या देशांपैकी भारत एक होता; पण पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून झालेला पराभव आणि त्यानंतर न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांच्या आशा पूर्णतः धुळीला मिळाल्या. यंदाच्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button