Hiccups Hookups Trailer : लारा दत्ता हिचे वेबसीरीजमध्ये बोल्ड सीन्स | पुढारी

Hiccups Hookups Trailer : लारा दत्ता हिचे वेबसीरीजमध्ये बोल्ड सीन्स

पुढारी ऑनलाईन :

लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपली नवी वेबसिरीज ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’मुळे (Hiccups Hookups Trailer) चर्चेत आहे. या वेब सीरीजबाबत लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे. ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. वेब सीरीज ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चा ट्रेलर पाहून म्हणता येईल की, लारा दत्ता हिने यात बोल्ड सीन्सही दिले आहेत.

हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स भारतात नवा ओटीटी प्लेटफॉर्म लायंसगेट प्ले (Lionsgate Play) वर रिलीज होणार आहे. मात्र वासूचा भाऊ तिच्या आयुष्यात नवे रंग भरतो, तिला नव्याने नाती बनवण्यासाठी प्रेरित करतो.

ही एक कॉमेडी फॅमिली ड्रामा वेब सीरीज आहे. या सीरिजमध्ये लारासोबतच राजुकमार राव, प्रतीक बब्बर आणि शिनोवा सोबतच अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील.

वेब सीरीजमध्ये दोन्ही कलाकारांचे एक आगळेच कुटुंब दिसेल ज्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच अजबगजब आहे.

या कलाकारांसह दिव्या सेठ, नासर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी, म्यांग चेंग, मीरा चोपड़ा आणि आयन जोया या सिरीजमध्ये दिसतील. वेब सीरीज ‘हिक्कप्स एंड हुकअप्स’चे दिग्दर्शन कुणाल कोहलीने केले आहे. ही सिरीज २६ नोव्हेंबरला ‘लायंसगेट प्ले’वर रिलीज होईल.

‘लायंसगेट प्ले’बाबत सांगायचे तर, नेटफ्लिक्स, अमेजन प्राइम वीडियो, डिज्नी+ हॉटस्टार जी5, एमएक्स प्लेयर, ऑल्ट बालाजीसारख्या डझनभर देशी-विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये आता ‘लायंसगेट प्ले’ने एन्ट्री केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

Back to top button