माझ्‍या मृतदेहाचे दफन नकाे, हिंदूंप्रमाणे माझा अग्‍निसंस्‍कार व्‍हावा : ‘वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचे मृत्युपत्र | पुढारी

माझ्‍या मृतदेहाचे दफन नकाे, हिंदूंप्रमाणे माझा अग्‍निसंस्‍कार व्‍हावा : 'वक्फ बोर्डा'चे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचे मृत्युपत्र

लखनौ; वृत्तसंस्था

माझ्या मृत्यूनंतर माझे पार्थिव लखनौमधील माझ्या हिंदू मित्रांच्या ताब्यात देण्यात यावे. माझ्या मृतदेहाचा मुस्लिम परंपरेप्रमाणे दफनविधी न करता हिंदूंप्रमाणे चिता रचून त्यावर दाहसंस्कार करण्यात यावेत, अशी खळबळजनक अंतिम इच्छा उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य आणि माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आपल्या मृत्युपत्रातून व्यक्त केली आहे.

वसीम रिझवी यांनी या मृत्युपत्रामध्ये त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे अधिकार आपण डासना मंदिराचे महंत नरसिह्मानंद सरस्वती यांना देत असल्याचे म्हटले आहे. रिझवी यांनी ही सगळी माहिती देणारा एक व्हिडीओही जारी केला आहे. कट्टरपंथीयांकडून माझी हत्या करण्याचा किंवा माझा शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. माझी हत्या करणार्‍याला रीतसर पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत, असा दावा रिझवी यांनी केला आहे.

वादग्रस्त व द्वेषमूलक असल्याने कुराणमधील 26 आयती हटविण्यात याव्यात म्हणून मी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. त्यामुळेच कट्टरपंथीय मला ठार मारण्याचा कट रचत आहेत, असे यात रिझवी यांनी म्हटले आहे. माझ्या मृतदेहाला कब्रस्तानात जागा दिली जाणार नाही, असेही कट्टरपंथीय म्हणत आहेत. माझ्या मृत्यूनंतर देशामध्ये शांतता कायम राहावी म्हणून मी हे मृत्युपत्र प्रशासनाला पाठवत आहे, असे वसीम रिझवी म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button