

छोट्या पड्यावरील अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Photos) अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. मौनी राय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. आता तिने स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो व्हाइट कलरच्या बिकिनीतील आहेत.
मौनी (Mouni Roy Photos) स्विमिंग पूलमध्ये बोल्ड अंदाजात दिसत असून तिने न्यूड ग्लॉसी मेकअप केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. हल्लीच मौनी रॉयने दुबईतून आपले काही फोटो शेअर केले होते. त्यात ती ऑरेंज कलरच्या ब्रालेटमध्ये दिसली होती. तसेच तिने क्रीम कलरचा हाय स्लिट स्कर्ट घातला होता. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ झाले होते.
तिच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर मौनी रॉय याआधी लंडन कॉन्फिडेंशियल मध्ये दिसली होती. आता ती ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे.