Gopichand Padalkar : बेताल वक्तव्याबाबत आ. पडळकरांना नोटीस | पुढारी

Gopichand Padalkar : बेताल वक्तव्याबाबत आ. पडळकरांना नोटीस

बारामती : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपिचंद पडळकर यांना बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत पडळकर यांनी लेखी माफी मागावी अन्यथा त्यांना न्यायालयात खेचू, असा इशारा यादव यांनी दिला. यादव यांनी ॲड.असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत पडळकर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

संबंधित बातम्या :

पवार कुटुंबीयांविरोधात वेळोवेळी जाणूनबुजून बेताल वक्तव्य करणाऱ्या, अनेक नागरिकांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करणाऱ्या व स्वतःच्या विधान परिषद निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या पडळकर यांच्या विरोधात ॲड. सरोदे यांच्या वतीने गुरुवारी (दि. १२) नोटीस बजावण्यात आली आहे. पडळकर यांनी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.

संबंधित बातम्या
Back to top button