अहमदनगर : पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात केरळमधून एकाला अटक | पुढारी

अहमदनगर : पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात केरळमधून एकाला अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अकोले येथील कांदा व्यापार्‍याची सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने केरळमधून एका आरोपीला अटक केली आहे. जयेश सन ऑफ गोपीनाथन (रा. त्रिशूर, केरळ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कांदा व्यापारी सीताराम काशिनाथ देशमुख (रा.कोतुळ, ता. अकोले) यांची 2017 मध्ये एक कोटी 53 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यात प्रोप्रा पी. पी. एच. टेडर्स, सी. एन. व्ही. मार्केट पालायाम (जि. कालीकेट, केरळ), प्रोप्रा सी. ए. ब्रदर्स, (मार्केट रस्ता, थोडूपुंजा, केरळ), प्रोप्रा अल्मास वनयण ट्रेडिंग कंपनी (त्रिंमबावर, त्रिशूर, केरळ), जयेश सन ऑफ गोपीनाथन व अब्दुला (रा. टेंपलगेट, ता. तलसरी, जि. कन्नूर, केरळ) या आरोपींचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास सुरू असून पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन शेख, अंमलदार अजय खोमणे, नियाज शेख यांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा

Ahmednagar Crime : तक्रार देण्यासाठी आले अन् आपसांत भिडले; पोलिस ठाण्यात दोन गटांत झुंज

नाशिक : पेठरोडच्या धुळीसाठी पुन्हा सात लाखांचा बार

INDIA नाही आता देशाचे नाव होणार भारत? भाजप नेत्‍यांचे संकेत आणि काँग्रेसचा आरोप

Back to top button