Ahmednagar Crime : तक्रार देण्यासाठी आले अन् आपसांत भिडले; पोलिस ठाण्यात दोन गटांत झुंज | पुढारी

Ahmednagar Crime : तक्रार देण्यासाठी आले अन् आपसांत भिडले; पोलिस ठाण्यात दोन गटांत झुंज

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले दोन्ही गट पोलिस ठाण्याच्या आवारातच एकमेकांना भिडले. या झुंजीने पोलिसांचीही तारांबळ उडाली. दोन्ही गटांच्या सहा जणांवर भिंगार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई निकीता सिुद्रक यांनी फिर्याद दिली. शाहरुख अस्लम मनियार, शबाना अस्लम मनियार, परविन शाहरुख मनियार (सर्व रा.माळीवाडा, नगर), नसीम रशीद शेख, अल्मास सैजल मनियार, मारुफअली रशीद शेख (रा.मुकुंदनगर, अ.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही गटांतील आरोपींची नावे आहेत.

रविवारी (दि.3) सायंकाळी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील तक्रारदार परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. पोलिस ठाण्यात अंमलदार कक्षात ड्युटीवर असलेले जी. एस. साठे यांनी तक्रारदारांना काय झाले, याची विचारणा केली. तेवढ्यात दोन्ही गटांतील सहा जणांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. के. दहिफळे तपास करीत आहेत.

हेही वाचा

जनसंवादाला विसंवादाचा अपशकून; जिल्हाध्यक्षांच्या नियोजनाचा आ. थोरातांना फटका

INDIA नाही आता देशाचे नाव होणार भारत? भाजप नेत्‍यांचे संकेत आणि काँग्रेसचा आरोप

बसल्या बसल्या पाय हलवणे चांगलेच! जाणून घ्या अधिक

Back to top button