Abhijit Gangopadhyay : ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी, भाजप उमेदवारावर प्रचारबंदी | पुढारी

Abhijit Gangopadhyay : ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी, भाजप उमेदवारावर प्रचारबंदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी अभद्र भाषा वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.21) भाजपच्या उमेदवारावर २४ तासांची प्रचार बंदीचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि तामलूक लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान गंगोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका केली होती. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने गोपाध्याय यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे दि. १७ मे रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने गंगोपाध्याय यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी लादण्याचा निर्णय घेतला.

काय आहे निवडणूक आयोगाचे म्हणणे

गंगोपाध्याय यांची भाषा अभद्र असून, पश्चिम बंगालच्या परंपरेचा अवमान करणारी आहे. एका सन्माननीय महिलेविषयी अभद्र भाषा वापरण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Back to top button