पिंपरी : पाच लाख मिळकतींचे ‘जीआयएस’ सर्वेक्षण | पुढारी

पिंपरी : पाच लाख मिळकतींचे ‘जीआयएस’ सर्वेक्षण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे (भौगोलिक माहिती प्रणाली) शहरातील 5 लाखांहून अधिक मिळकतींचे सर्वेक्षण पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आले आहे. तो जीआयएस डेटा पालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग आणि कर संकलन विभागाच्या डेटाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अधिकृत व अनधिकृत मिळकती ओळखता येतील. त्यामुळे पालिकेच्या मिळकतकर महसूलात वाढ होईल. हा प्रकल्प 15 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली.

जीआयएस प्रकल्प 15 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. यातील 20 आयटी अ‍ॅप्लिकेशन्स प्रथम सुरू करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने पालिकेच्या सर्व विभागांमध्ये हे मॉड्युल सूरू करण्यात येणार आहे. पालिकेचे संकेतस्थळ आणि स्मार्ट सिटी अ‍ॅपला देखील ही सुविधा जोडण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्व सुविधांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

हे सर्वेक्षण एटॉस इंडिया प्रा.लि. या ठेकेदारामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांकडून आवश्यक माहिती तसेच, मिळकतरकर पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. ईआरपी, जीआयएस व डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे.

सर्वेक्षणात ही माहिती

डेटा व सॅटेलाइट इमेज वापरून 12 लाख 50 हजार वैशिष्ट्येे तयार करण्यात आली आहेत. दोन लाख इमारतींचे फूटप्रिंट्स सॅटेलाईट इमेजवर डिजिटल मार्किंग करण्यात आले आहे. आठ हजार लिनियर किलोमीटर रस्त्यांची नोंद करण्यात आली आहे. 870 लिनिअर किलोमीटर ड्रेनेजलाईनची नोंद आहे. 350 लिनिअर किलोमीटर पाईपलाइनची नोंद आहे. एक लाख 40 हजार लिनिअर किलोमीटर चेंबरची नोंद करण्यात आली आहे. 210 पूल व उड्डाणपुलांची नोंद झाली आहे. 70 हजार पथदिवे नोंदविले आहेत.

हेही वाचा

नगर रोड परिसरातील रस्त्यांची लागली वाट !

केरळच्या युवकाने सर केले २७० गड-किल्ले, वर्षभरात हजारो किमी सायकलप्रवास

पुणे : समाविष्ट गावांतील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ!

Back to top button