Beed Accident : धारूर घाटात सहा वाहने एकमेकांना धडकली | पुढारी

Beed Accident : धारूर घाटात सहा वाहने एकमेकांना धडकली

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर घाटात रविवारी सकाळी (दि.२३) साडेआठच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा वाहने एकमेकांना धडकली. या अपघातातील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. महेश लाखे असे त्याचे नाव आहे. अंबाजोगाई येथील एस आर टी येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अरुंद रस्ता व अवघड वळणांमुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात आज सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर सिमेंट घेऊन जाणारे वाहन व किया गाडीचा (MH२२AW३१०९) अपघात झाला. त्याचवेळी अपघाताच्या ठिकामी दुसऱ्या सिमेंट घेऊन जाणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या धडकेने दुचाकी (MH23J ९३१०) समोर असलेल्या क्रुझर (MH१३ DE१४७८) ला मागून जाऊन धडकली. तर क्रूजर पुढील एका टिप्परला आदळली. या अपघातामध्ये दुचाकी वरील महेश लाखे हा गंभीर जखमी झाला आहे. महेश हा पाणी फाऊंडेशनचा कार्यकर्ता असून तो कामानिमित्त जात होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button