बीड लोकसभा : जरांगे फॅक्टर चालणार की पंकजा मुंडेंचा करिष्मा | पुढारी

बीड लोकसभा : जरांगे फॅक्टर चालणार की पंकजा मुंडेंचा करिष्मा

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुसाठी बीड मतदारसंघात ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे चित्र आहे. ही वाढीव टक्केवारी कोणाला फायदेशीर ठरणार, याची आकडेमोड दोन्ही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. तर पंकजा मुंडे आपला करिष्मा दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीड मतदारसंघात पंकजा मुंडेंचा करिष्मा चालणार का?

  • बीड मतदारसंघात ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
  • मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार
  • दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे चित्र
  • शरद पवारांकडून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंचा भाषणात उल्लेख

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे नाव घेतले होते. त्यातूनही सुचक संदेश गेल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यातही गत वेळच्या तुलनेत चार टक्के मतदान वाढले आहे. गेल्या वेळी ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजी नगरमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

मतदानाच्या टक्केवारीला जातीय संघर्षाची झालर

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. मात्र, बीड आणि जालना या दोन मतदारसंघांमध्ये टक्केवारी वाढली असून त्याला जातीय संघर्षाची झालर असल्याची चर्चा आहे. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान झाले. पुण्यात गतवेळच्या तुलनेत मत टक्का वाढला आहे. २०१९ मध्ये पुण्यात ४९.८९ टक्के मतदान झाले होते. यंदा ५२ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. गेल्या वेळी ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष आहे. सध्या मराठा आरक्षणाचे वादळ सुसाट सुरू असताना मराठा समाजाच्या विरोधात जाऊन लोकनेत्या पंकजा मुंडे यांचा प्रचार मराठा नेते आमदार सुरेश धस, आमदार आजबे व आमदार धोंडे यांनी मराठा समाजाच्या विरोधात जाऊन प्रचार केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातून किती हजारांची लिड मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button