Adipurush : लोकांच्या भावना दुखावल्या, मी हात जोडून माफी मागतो-मनोज मुंतशिर | पुढारी

Adipurush : लोकांच्या भावना दुखावल्या, मी हात जोडून माफी मागतो-मनोज मुंतशिर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक ओम राऊत यांचा चित्रपट ‘आदिपुरुष’वर रिलीज होताच वाद निर्माण झाला. चित्रपटातील अनेक डायलॉग्जमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे आदिपुरुष चित्रपटावर जोरदार टीका झाली. (Adipurush) सोशल मीडियावर देखील लोकांनी या चित्रपटाचे डायलॉग रायटर मनोज मुंतशिर यांनादेखील खूप ट्रोलदेखील केलं. ट्रोलिंगनंतर आता मनोज मुंतशिर यांनी हात जोडून माफी मागितली आहे. तसे ट्विट मुंतशिर यांनी केले आहे. (Adipurush)

मनोज मुंतशिर यांनी मागितली माफी

मनोज मुंतशिर यांनी ट्विट करून फॅन्स, साधू-संत आणि श्री राम यांच्या भक्तांच्या भावना पोहोचल्याने माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- मी स्वीकार करतो की, चित्रपट आदिपुरुषमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्व भाऊ-बहिण, पूज्य साधू-संतं आणि श्री राम यांच्या भक्तांची मी हात जोडून विनाशर्त माफी मागतो. भगवान बजरंग बली आपल्या सर्वांवर कृपा करो, आम्हाला आणखी एक अतूट राहून आपले पवित्र सनातन आणि महान देशाची सेवा करण्याची शक्ती देवो.

‘आदिपुरुष’च्या डायलॉग्जने का निराश झाले चाहते?

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह होता. चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगदेखील झाली. प्रभास-कृतीच्या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना फक्त निराशाच मिळाली. चित्रपटाच्या संवादाने प्रेक्षक निराश झाले.

लोकांचे म्हणणे आहे की, मनोज मंतशिर यांनी चित्रपटाचे डायलॉग्ज रामायणानुसार नाही तर विचित्र भाषेत लिहिले. डायलॉग्जवरून मनोज मंतशिर यांना लोकांचा राग अद्यापही सहन करावा लागत आहे. ट्रोलिंगनंतर रायटरने अनेक वेळा स्पष्टीकरणदेखील दिले आणि त्यांना माफीदेखील मागावी लागली.

Back to top button