Samantha Ruth : काय सामंथाचं आजारपण वाढलं! ब्रेक घेत निर्मात्यांचे पैसेही केले परत? | पुढारी

Samantha Ruth : काय सामंथाचं आजारपण वाढलं! ब्रेक घेत निर्मात्यांचे पैसेही केले परत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामंथा रुथ प्रभुचे मागील दोन चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटले. ‘यशोदा’ आणि ‘शाकुंतलम’ दोन्हीही स्त्री प्रधान चित्रपट होते, जे फ्लॉप ठरले. (Samantha Ruth) सध्या वरुण धवनसोबत ती वेब सीरीज ‘स‍िटाडेल’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आता मोठे वृत्त समोर आले आहे की, ‘स‍िटाडेल’नंतर ॲक्‍ट‍िंग करिअरमधून ती एक वर्षाचा ब्रेक घेतेय.  (Samantha Ruth)

रिपोर्ट्सनुसार, सामंथाने हा निर्णय ऑटो-इम्‍यून आजार ‘मायोस‍िटिस’ साठी घेतला आहे. ती आधी आपल्या आरोग्यावर लक्ष देणार आहे. यासाठी तिने ब्रेक घेण्याची तयारीही सुरु केलीय. मीडिया रिपोर्टनुसार, ती लवकर लवकर शूटिंग पूर्ण करण्यात बिझी आहे. तर काही निर्मात्यांचे तिने पैसे परत केल्याची माहितीही समोर आलीय.

तिच्याकडे ‘कुशी’ हा चित्रपटदेखील आहे. ‘कुशी’मध्ये सामंथासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहेत. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सामंथा स्वस्थ होण्यासाठी एक वर्षाचा दीर्घ ब्रेक घेईल. तसेच मायोसिटिसच्या उपचारावंर लक्ष केंद्रित करेल.

जवळपास एक वर्षापूर्वी सामंथाला ‘Myositis’ विषयी समजलं होतं. तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत ही माहिती शेअर केली होती. तिने एक इन्स्‍टाग्रामवर एक मोठी नोट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं की- ‘डायगनोसिसला जवळपास एक वर्ष गेले. एक वर्षापासून जबरदस्तीने एक नवं नॉर्मल आयुष्य जगत आहे. माझ्या शरीरासोबत माझं स्वत: ची लढाई… न मीठ, न साखर आणि न अन्न, खासकरून औषधांसोबत कॉकटेलसह एक जबरदस्तीने शटडाऊन आणि जबरदस्तीने रीस्टार्ट.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button