Adipurush चे पटकथा लेखक मनोज मुंतशिर यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा | पुढारी

Adipurush चे पटकथा लेखक मनोज मुंतशिर यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरून सुरक्षेची मागणी केल्याल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आदिपुरुष चित्रपटावर वाद सुरु आहे. आदिपुरुषमध्ये दाखवण्यात आलेल्या संवादांवरून देशभरात विरोध होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. मनोज मुंतशिर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.

दरम्यान प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट आदिपुरुष शुक्रवार म्हणजेच १६ जून रोजी रिलीज झाला होता. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. परंतु, आदिपुरुषमध्ये दाखवण्यात आलेल्या संवादावरून याचा देशभरात विरोधदेखील होत आहे. चित्रपटावर बंदी देखील घालण्याची मागणी होत आहे. रामायणवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.

 

Back to top button