मुलगा अन् शेजारीही गायब: सहा वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा | पुढारी

मुलगा अन् शेजारीही गायब: सहा वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मावशीच्या मुलीचे लग्न आहे, तुमच्या मुलाला आम्ही गावाला घेऊन जातो म्हणून शेजारी सहा वर्षाच्या चिमुरड्याला घेऊन गेले खरे. मात्र बरेच दिवस उलटूनही ते मुलाला घेऊन न आल्याने त्यांच्यावर आता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुलाच्या घरातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. अंजली प्रमोद शुक्ला (21) आणि नितीन प्रमोद शुक्ला (19, दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका 38 वर्षीय महिलेनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे कुटुंबीय येरवड्यात त्याच्या नातेवाईकांकडे सहा वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते. त्याच्या शेजारी एक उत्तरप्रदेशातील कुटुंब राहत होते. एकमेकांचे शेजारी असल्याने व सलोख्याचे वातावरण असल्याने अंजली आणि प्रमोद यांनी फिर्यादी यांच्या सहा वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलीच्या लग्नाला घेऊन जाऊ का ? अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादींनी हो, नाही म्हणत मुलाला त्यांच्याबरोबर आठवडाभरापूर्वी स्वखुशीने पाठवले. उत्तर प्रदेशात पोहचल्याबाबत त्यांचा फोनही आला. मात्र, अचानक प्रमोद आणि अंजलीचा फोन वारंवार स्विचऑफ येत असल्याने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांची धाकधुक वाढली. सरते शेवटी त्यांनी येरवडा पोलिस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली आहे. येरवडा पोलिस उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. तेथील स्थानिक पोलिसही मुलाचा शोध घेत असून येरवडा पोलिसांकडून सर्व बाजुंनी मुलाशी व त्या दोघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा:

पुणे: एनडीएतील उच्च पदस्थ अधिकार्‍याला डांबून ठेवत मारहाण

मुलगा अन् शेजारीही गायब: सहा वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा

पुणे : पर्यायी रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने नाराजी

 

Back to top button