RR vs RCB : बंगळुरूचे राजस्थानला 173 धावांचे आव्हान | पुढारी

RR vs RCB : बंगळुरूचे राजस्थानला 173 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरखेळला जात आहे. हा सामना नॉकआऊट असून हरणारा संघ थेट आयपीएलमधून बाहेर पडेल. तर. विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. ( RR vs RCB)

बंगळुरूचे राजस्थानला 173 धावांचे आव्हान

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या इलिमिनेटर सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रतम फलंदाजी करताना बंगळुूरूने 8 फलंदाज गमावून 172 धावा केल्या. यामध्ये रजत पाटीदारने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. पाटीसोबत विराट कोहली (33), लोमरोर (32) आणि कॅमरून ग्रीन (27) यांनी निर्णायक खेळी केली. तर, गोलंदाजीमध्ये राजस्थानच्या आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याच्यासह अश्विनने 2 तर, चहल, बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.,

दोन्ही संघांचे प्लेइंग -11

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

इम्पॅक्ट प्लेयर : स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, हिमांशू शर्मा.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट प्लेयर : नांद्रे बर्जर, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, तनुष कोटियन, शिमरॉन हेटमायर.

Back to top button