Jalgaon News | बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्री होणार वन्यप्राणिगणना, वन विभाग सज्ज | पुढारी

Jalgaon News | बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्री होणार वन्यप्राणिगणना, वन विभाग सज्ज

जळगाव पुढारी वृत्तसेवा -जिल्ह्यातील चोपडा वनक्षेत्रापासून ते रावेर वन क्षेत्रामधील ठिकठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री (दि.23) प्राणिगणना करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण जंगल परिसरात 43 मचन बनविण्यात आले आहेत. ट्रॅप कॅमे-याव्दारे देखील गणना केली जाणार असून नवखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विदयार्थी यांना देखील संपुर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा त्यासाठी दर्शन देणा-या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणुन यावल वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले जाते.

बुध्द पौर्णिमेला दि. २३ रोजी यावल वनविभागातील चोपडा वनक्षेत्र पासुन ते रावेर वनक्षेत्र मधील ठिक ठिकाणी जंगल भागात मचान तयार करण्यात आले आहेत. यावल वनविभागात चोपडा वनक्षेत्रात ०३, वैजापुर वनक्षेत्रात ०७ मचान, अडावद वनक्षेत्रात ०४ मचान, देवझिरी वनक्षेत्रात ०४ मचान, यावल पुर्व वनक्षेत्रात ०७ मचान, यावल पश्चिम वनक्षेत्रात ०६ मचान तर रावेर वनक्षेत्रात १२ मचान असे एकुण ४३ मचान यावल वनविभागात तयार करण्यात आले आहे.

मचाणावर बसून वन्यप्राण्यांची मोजणी

सदर मचाण वर ५ ते ६ व्यक्ती एका वेळेस बसु शकतात. बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यावल वनविभागातील वन्यप्राणी गणनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात निसर्गानुभव घेत असतांना तसेच रात्री प्राणी प्रगणना करीत असतांना प्रामुख्याने बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, यांसह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षीही आढळतात जंगल सफारीच्या दरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभवही मिळतो.

यावल वनविभागातील नैसर्गिक पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुध्द पाणी पुरवठा करणे, पाणवठ्या शेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरु आहेत.

यावल वनविभागात निसर्ग प्रेमींना जंगल सफारी मार्गाचा सुध्दा चांगला घेण्यासाठी नियोजन केले जात आहे. सदर प्राणी प्रगणना करीता काही अडचण आल्यांस आपण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांचेशी संपर्क साधावा. यावल वनविभागातील सातपुड्यामधील निसर्गरम्य अनुभवाची संधी सर्वप्रथम मिळत असुन लोकांनी निसर्गानुभव साठी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवावा.

सदर कार्यक्रमाचे नियोजन वनसंरक्षक धुळे (प्रा.) वनवृत्त धुळे निनू सोमराज, उपवनसंरक्षक, यावल जमीर एम. शेख, वनविभाग जळगांव, प्रथमेश वि. हाडपे सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मागदर्शनाखाली वनपरिक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुर करीत आहेत.

हेही वाचा –

Back to top button