Maternity : बाप रे!!! ७० व्या वर्षी ‘या’ आजींनी दिला बाळाला जन्म… | पुढारी

Maternity : बाप रे!!! ७० व्या वर्षी 'या' आजींनी दिला बाळाला जन्म...

राजकोट (गुजरात), पुढारी ऑनलाईन : तुम्हाला ही बातमी वाचून आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे की, ज्या वयात नातवंडांना खेळवायचं त्या वयात ७० वर्षांच्या आजीने चक्क एका बाळाला जन्म (Maternity) दिला आहे. ही आश्चर्यकारक घटना मागील महिन्यात गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात घडली आहे.

IVF तंत्रज्ञानामुळे ७० वर्षांच्या आजीने बाळाला जन्म (Maternity) देणं शक्य झालं आहे. या आजीबाईंची प्रसुती करणं भुजमधील डाॅक्टरांसाठी मोठं आव्हान होतं. ७० व्या वर्षी बाळाला जन्म देणाऱ्या आजीबाईंचं नाव जिवूबेन राबरी आहे. त्यांना तब्बल ४५ वर्षांनंतर हा मुलगा झाला आहे. मुलाच्या जन्माने कुटुंब आणि नातेवाईंकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लग्ना ४५ वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते. IVF करणारे डाॅ. नरेश भानुशाली यांनी या दाम्पत्याला IVF मधून होण्याऱ्या मुलाच्या जन्माच्या प्रक्रियेतील अडचणी सांगितल्या. त्यातील धोकेही सांगितले. या वयात मुलाला जन्म देणं कठीण आहे, असं सांगितलं. शेवटी दाम्पत्याने हा निर्णय घेतला आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.

या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण, ७० व्या वर्षी एखाद्या आजीबाईंना मूल होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. या वयात शरीराच्या अडचणी वाढलेल्या असतात. पण, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या आजीबाईलाही मूल होणं शक्य झालं आहे.

या दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन हा माध्यमांनी ही बातमी दिली. त्यात जगातली ही पहिली घटना असल्याचा दावाही त्यांनी केली. पण, यापूर्वी युरोपच्या एलिजाबेथ एडिनीच्या वयस्कर माता बनण्याचे रेकाॅर्ड आहे. तिने ५० वर्षांपेक्षा जास्त वयात मुलाला जन्म दिलेला होता. पण, IVF तंत्रज्ञानावर युकेमध्ये बंदी घातलेली होती. त्यामुळे तिला दुसऱ्या देशात (युक्रेनला) स्थलांतर करावे लागले.

पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली ?

Back to top button