पैठण क्राईम : पुरुषांना बांधून दरोडेखोरांचा दोन महिलांवर बलात्कार | पुढारी

पैठण क्राईम : पुरुषांना बांधून दरोडेखोरांचा दोन महिलांवर बलात्कार

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पैठण क्राईम) असलेल्या तोंडोळी येथे मंगळवारी रोजी मध्यरात्री सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून शेती वस्तीवर राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह पैठण पाचोड बिडकीन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पोहचून घटनेची माहिती घेतली.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तोंडोळी गावालगत औरंगाबाद येथील मगरे यांची शेती वस्ती आहे. या ठिकाणी राजू टेमा बारेला (रा. बलोली जि. मध्यप्रदेश) यांच्या सह तीन परप्रांतीय परिवार मजूर शेतीकामासाठी ठेवण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे हे कुटुंब शेती वस्तीवर झोपेल असताना सहा ते सात दरोडेखोरांनी हातामध्ये प्राणघातक शस्त्रांसह धुमाकूळ घातला.

सात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने शेतवस्तीवर मंगळवारी रात्री धुमाकूळ घातला. एका घरातील कुटुंबीयांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्यासमोर दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. यातील एक पीडिता दोन महिन्यांची बाळंतीण आहे.

तोंडोळी शिवारातील एका शेतात मध्य प्रदेशातील कुटुंब राहते. शेतमजूर असलेले हे कुटुंब काम करून उदरनिर्वाह भागविते. कुटुंबात सात सदस्य आहेत. मंगळवारी रात्री ते जेवण करून घरात झोपी गेले. मध्यरात्री सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर हल्‍ला केला. दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना कुर्‍हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. त्यांचे हात-पाय बांधून खोलीत डांबले. त्यानंतर दोन महिलांवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी दरोडेखोरांनी 50 ते 60 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पीडितेवर सामूहिक बलात्कार

सात दरोडेखोरांपैकी तिघांनी दोन महिलांवर अत्याचार केला. एका पीडितेवर एकाने आणि दुसर्‍या पीडितेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. महिलांसह सर्वच कुटुंबीयांनी दयेची याचना केल्यानंतरही त्यांना पाझर फुटला नाही. तिघे अत्याचार करीत असताना त्यांच्यासोबत असणारे इतर दरोडेखोर आपल्याच साथीदारांना शिवीगाळ करीत होते. त्यानंतरही नराधम दरोडेखोरांनी दयामाया दाखविली नाही.

अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथक स्थापन करण्यात आले आहे. यासह या दरोडेखोरांनी लोहगाव परिसरात एका शेतावर जाऊन येथील काही नागरिकांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचा येथील नागरिक सांगत आहे. दरोडेखोरांचा गोंधळामध्ये तोंडोळी वस्तीवर राहणारे नागरिक किरकोळ जखमी झाले.

पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली?

Back to top button