तरुणीला ऑनलाईन दारु पडली महागात; १ लाख ४४ हजारांची फसवणूक | पुढारी

तरुणीला ऑनलाईन दारु पडली महागात; १ लाख ४४ हजारांची फसवणूक

अलिबाग, पुढारी ऑनलाईन

कोरोना काळात ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे मात्र, आपण सतर्क नसू तर हमखास फसवणूक होऊ शकते. याचा अनुभव अलिबाग येथील एका तरुणीला बसला आहे. संबधित तरुणीचे लग्न ठरल्याने तिने हळदीसाठी ऑनलाईन दारू ऑर्डर केली मात्र, भामट्यांनी तिला चक्क एक लाख ४४ हजारांना गंडा घातला.

याप्रकररी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत. ऑनलाईन खरेदी करताना सतर्कतेने खरेदी करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सोनाली कदम यांनी केले आहे.

अलिबागमधील एका तरुणीचे लग्न ठरले असून हळदीचा समारंभ मोठा असल्याने त्यासाठी पाहुण्यासाठी दारुची सोय करण्याचे ठरविले. तिने गुगल प्ले स्टोअरवर पीके वाईन्सचे ॲप डाऊनलोड केले. त्यावर मद्याच्या आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या होत्या. त्या पेजवरील पीके वाईन्सच्या फोन नंबरवर संपर्क साधून तिने दारुची ऑर्डर दिली. डिलिव्हरी देण्याआधी पैसे द्यावे लागतील असे समोरील व्यक्तीने सांगितल्याने तिने ऑनलाईन पैसे पाठविले. मात्र, पैसे मिळाले नसल्याचे सांगत वारंवार पैसे पाठविण्यास सांगून जवळपास १ लाख ४४ हजार, २६ रुपये त्याने उकळलले. पैसे पाठवूनही त्याने आर्डर दिली नाही. काही वेळाने संबधित तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

आपण फसलो गेल्याचे महिलेला कळल्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button