नागरी भागातील नैसर्गिक नद्या-नाले निचरा प्रणाली पुनर्स्थापित केली जाणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या पूर नियंत्रणासाठी उपाय योजना राबविण्याबाबत नेमण्यात आलेल्या कृष्णा खोरे पूर अभ्यास समिती यांनी ही शिफारस केली आहे. नवीन जलसाठे निर्माण करण्याबरोबर धरणांची उंची वाढवण्याचीही शिफारस मान्य करण्यात आली आहे.
राज्य शासनाने त्यासह अभ्यास समिती यांनी सूचवलेल्या 18 पैकी 10 शिफारसी पूर्णपणे, पाच शिफारशी अंशत:, एक सुधारणेसह स्वीकारल्या आहेत. दोन शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत. कृष्णा खोर्यातील पाणी भीमा खोर्यात वळवण्याची शिफारस अमान्य करण्यात आली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदी प्रवाहाचे सरळीकरण करण्याची शिफारस अंशत: स्वीकारण्यात आली आहे. या परिसरात असलेल्या सुपीक जमिनीचा विचार करता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी बोगद्याद्वारे प्रवाहाचे सरळीकरण करण्याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ऑगस्ट 2019 मध्ये महापूर आला होता. या महापुराची कारणे व उपाय योजना याकरिता राज्य शासनाने कृष्णा खोरे पूर अभ्यास समितीची स्थापना केली होती. या समितीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. विविध उपाय योजना, पर्जन्यमानाचे इशारे, प्रत्यक्ष पडलेला पाऊस, जुलै, ऑगस्ट महिन्यातील प्रत्यक्ष परिस्थिती, त्याबाबतची सर्व आकडेवारी, विविध अधिकारी, तज्ज्ञांसमवेत झालेल्या बैठका याद्वारे 18 शिफारसींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला. यापैकी 11 शिफारसी पूर्ण स्वीकारण्यात आल्या आहेत. पाच शिफारशी अंशत: स्वीकारण्यात आल्या आहेत, तर दोन शिफारशी अमान्य करण्यात आल्या आहेत.
1. खोरेनिहाय पूर सनियंत्रण मंडळ स्थापन करणे.