चंद्रपूर: खाटेला हातपाय बांधून जावयाचा गळा कापून खून | पुढारी

चंद्रपूर: खाटेला हातपाय बांधून जावयाचा गळा कापून खून

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्डात जावयाचा खाटेवर हातपाय बांधून गळा कापून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना आज (दि.२२) पहाटेच्या सुमारास घडली. विशाल दासरवार असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. घराच्या संपत्तीतून हा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्डात दुर्गा माता मंदिरजवळ शामराव कोडूरवार पत्नीसोबत राहत होते. त्यांना तीन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर संपतीवरून नेहमी भांडण होत होते. त्यात दुसऱ्या नंबरचा जावई विशाल दासरवार नेहमी सासू सोबत भांडण करायचा. आज पहाटे विशाल दासरवार घरात खाटेवर झोपला होता. यावेळी त्याचे हात पाय बांधून गळा कापून खून करण्यात आला.
विशाल नेहमी दारू पिऊन सासूसोबत भांडण करीत होता. विशालची पत्नीसुद्धा आपल्या पतीसोबत मिळून आईशी भांडण व मारहाण करीत होते. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा 

Back to top button