चंद्रपूर : वादळी वाऱ्यामुळे मोबाईल टॉवर घरावर कोसळला | पुढारी

चंद्रपूर : वादळी वाऱ्यामुळे मोबाईल टॉवर घरावर कोसळला

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वादळी वाऱ्यामुळे १२१ फूट उंचीचा मोबाईलचा टॉवर कोसळून एका घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथे घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु श्रीनाथ चुंद्री यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळपासून चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढला होता. परंतु, सायंकाळी ६ नंतर वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर काही वेळाने सुसाट वारा सुटला. आभाळ दाटून आले, विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी पाऊसही कोसळला. दरम्यान, टॉवर श्रीनाथ चुंद्री यांच्या घरावर कोसळला. घरी सर्वजण होते. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button