WB Nominee Ajay Banga: जागतिक बँक अध्यक्षपदाचे उमेदवार ‘अजय बंगा’ भारत दौऱ्यादरम्यान कोविड पॉझिटीव्ह; PM मोदींची घेणार होते भेट | पुढारी

WB Nominee Ajay Banga: जागतिक बँक अध्यक्षपदाचे उमेदवार 'अजय बंगा' भारत दौऱ्यादरम्यान कोविड पॉझिटीव्ह; PM मोदींची घेणार होते भेट

पुढारी ऑनलाईन:  युनायटे स्टेटचे जागतिक बँक अध्यक्षपदाचे उमेदवार अजय बंगा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. बंगा यांनी त्यांच्या जागतिक दौऱ्यादरम्यान कोविड-१९ च्या अनेक चाचण्या केल्या होत्या. भारत दौऱ्यापूर्वी त्यांनी (WB Nominee Ajay Banga) कोविड टेस्ट केली होती, तेव्हा ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. दरम्यान ते दिल्लीमध्ये पोहोचताच त्यांची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, अशी माहिती नवी दिल्लीतील यूएस दूतावासाने दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यात भारतात इन्फ्लूएंझा आणि कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ (WB Nominee Ajay Banga) होत आहे. बुधवारी अद्ययावत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 1,134 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर सक्रिय प्रकरणे 7,026 वर पोहोचली आहेत.

जागतिक बँक अध्यक्षपदाचे उमेदवार अजय बंगा (WB Nominee Ajay Banga) हे सध्या जागतिक दौऱ्यावर आहेत. २३ आणि २४ मार्च दरम्यान ते भारतातील नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. तीन आठवड्यांच्या जागतिक दौऱ्याचा त्यांचा भारतातील हा शेवटचा टप्पा आहे. बंगा यांनी त्यांच्या जागतिक दौऱ्याचा प्रवास आफ्रिकेतून सुरू केला आहे. त्यानंतर त्यांनी युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियातील देशांमध्ये भेटी दिल्या आहेत.

WB Nominee Ajay Banga: पीएम मोदी आणि नेत्यांची घेणार होते भेट

जागतिक बँकेचे उमेदवार अजय बंगा हे भारत दौऱ्या दरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार होते. या शिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस.के. जयशंकर यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांना भेटण्याचा कार्यक्रम देखील नियोजित करण्यात आला होता. दरम्यान जागतिक बँक आणि जागतिक आर्थिक विकास आव्हानांवर भारतातील मुख्य नेते आणि अजय बंगा यांच्यात चर्चा होईल.

हेही वाचा:

Back to top button