हिंगोली : जवळाबाजारच्या उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली | पुढारी

हिंगोली : जवळाबाजारच्या उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : जवळाबाजार ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सदस्यांकडून औंढानागनाथ तहसीलदारांकडे लेखी निवेदन दाखल करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उपसरपंच यांच्या वरील अविश्वास ठरावाबाबत विशेष सदस्य बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार राजूभैया नवघरे भाजप आघाडी विरुद्ध माजी सभापती मुनीर पाटील यांच्या मध्ये लढत झाली होती. एकूण १७ सदस्यांपैकी आघाडीचे ९ उमेदवार तर मुनीर पाटील यांचे ८ उमेदवार निवडून आले. सरपंचपदी डॉ.जयप्रकाश मुंदडा गटाचा तर उपसरपंचपदावर आमदार राजूभैया नवघरे यांच्या गटाचे सय्यद अंजुम सय्यद फारूख भाई विराजमान झाले. पण सध्या राजकार पलटले आणि सध्याच्या सरपंचांकडील ७ सदस्य व  मुनीर पाटील यांचे ५ सदस्य अशा एकूण १२ सदस्यांनी सोमवारी (दि. २०) तहसीलदारांना उपसपच यांच्याविरूद्धच्या तक्रारीचे निवेदन दिले. गावातील विविध विकास कामांकडे उपसरपंच यांचे लक्ष नाही,असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच स्वाती दत्तराव अंभोरे, निळकंठ रावसाहेब अंभोरे, निमा धनंजय तेरसे, अविनाश सिताराम मुळे, शेख महुनजीब शेख खदीर, विकास किसन पांडववीर, वर्षा कृष्णा दावलबाजे, गणेश शेषराव गाढवे, नंदकिशोर जयप्रकाश बाहेती, सुनिता ज्ञानेश्वर अंभोरे, राजु गंगाराम पवार, आरती नेमाजी चौरे यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button