Kanhaiya Kumar : ‘राहुल गांधींना ईडीची भीती नाही, म्हणून छातीठोक प्रश्न विचारतात’ | पुढारी

Kanhaiya Kumar : 'राहुल गांधींना ईडीची भीती नाही, म्हणून छातीठोक प्रश्न विचारतात'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Kanhaiya Kumar : राहुल गांधी यांना ईडी च्या कारवाईची भीती नाही,  त्यामुळे ते सरकारला न भिता प्रश्न विचारतात. जे इमानदार आहेत ते त्यांच्या मागे उभे राहतील, असे प्रतिपादन कन्हैया कुमार यांनी केले आहे.

कन्हैया कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केला असून या दरम्यान काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षावर टीका केली आहे.

Kanhaiya Kumar : भाजपशी लढण्यासाठी काँग्रेस एकमेव पर्याय

पंजाब आणि छत्तीसगढृ येथे पक्षात अंतर्गत मतभेद जोरात आहेत. त्यावर भाष्य करताना कन्हैया कुमार म्हणाले, काँग्रेस पक्ष चंद्रासारखा आहे.

कित्येक वेळा असे वाटते की, तो वाढत आहे. मात्र, असे नसते, प्रत्यक्षात वेगळेच काहीतरी असते.

भाजपशी लढण्यासाठी देशात एकमात्र भरवसा करावा असा हा पक्ष आहे.

Kanhaiya Kumar : काँग्रेसमध्ये सर्वाधिक लोकशाही

कुटुंबात काहीतरी कुरबुरी असू शकतात. कुणीही एका मतावर सहमत असू शकत नाहीत, मात्र, एकीकडे भाजप आहे आणि दुसरीकडे केवळ काँग्रेस.

ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यातील वादाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे.

काँग्रेस हा सर्वाधिक लोकशाही आणि जुना पक्ष आहे. त्यामुळे तेथे वादविवाद होत राहणार.

राहुल गांधीवर नेत्यांचा निशाना

गेल्या काही दिवसांपासून पक्षात कुरबुरी सुरू आहेत. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नटवर सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ( राहुल गांधी ईडी )  ‘सध्या पक्ष ज्या अवस्थेत आहे ते काही ठीक नाही. पक्षाची अशी स्थिती होण्यासाठी केवळ तीन लोक जबाबदार आहेत. राहुल गांधी यांच्याकडे कुठलेही पद नाही तरीही ते निर्णय घेत आहेत. ’

पक्षात कुरबुरी

आमदार जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार याने दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात तरुणांची फळी उभी राहत असताना जुने नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत कुरबरी वाढल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: 

Back to top button