Shweta Shinde : श्वेता शिंदेकडून घायाळ अदांची मालिका सुरुच! | पुढारी

Shweta Shinde : श्वेता शिंदेकडून घायाळ अदांची मालिका सुरुच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आघाडीची टिव्ही मालिका निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) पुन्हा एकदा आपण ग्लॅमरस असल्याचं सिध्द केलंय. एका मागोमाग एक फोटोज शेअर करत तिने आपल्या निखळ सौंदर्य सर्वांसमोर आणलं आहे. काळ्या रंगाच्या साडीत Shweta Shinde हिने फोटोशूट केलंय. या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

डॉक्टर डॉन या मालिकेतून डॉलीबाई म्हणून तिची ओळख झाली. अभिनयासोबतचं तिने अनेक मालिकांची निर्मिती केलीय. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. सौंदर्याबरोबरचं तिचा कसदार अभिनयही आहे. विशेष म्हणजे तिची उंची लक्ष वेधून घेते.

स्लिव्हलेस ब्लाऊजवर काळ्या रंगाची साडी तिने नेसलीय. तिने आपल्या फोटोला कॅप्शन लिहिलीयं-Black makes everything more Classy..

श्वेता शिंदे
श्वेता शिंदेचं ग्लॅमरस रूप

तिने दोन फोटो अपलोड केले आहेत. एका फोटोला तिला Stunning swagAbsolutely true… black gives shine to others…., Your Hairs, Black Beauty, Beautiful Sister, Beauty in black असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले आहेत.

काहींनी तिला ब्लॅक डायमंड असे म्हटले आहे. ब्लॅक ब्युटी म्हणत तिने या साडीवर मॅचिंग कलरच्या बंगड्याही घातल्या आहेत. फार साजशृंगार न करता अगदी साधा मेकअप असूनदेखील ती या साडीत फार सुंदर दिसतेय.

झी युवा वाहिनीवर देवदत्त नागे आणि श्वेता हे ‘डॉक्टर डॉन’ या विनोदी मालिकेत दिसले. यामध्ये तिची डॉलीबाई ही व्यक्तीरेखा आहे. अवंतिका, अवघाची हा संसार आणि वादळवाट अशा मराठी मालिकांमध्ये तिने काम केलंय.

श्वेता शिंदे
श्वेता शिंदेने काळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलंय

श्वेता शिंदेविषयी जाणून घ्या या गोष्टी

साताऱ्याची श्वेता शिंदे मुंबईत येऊन कशा प्रकारे आपलं करिअर यशस्वी केलं, पाहुया. श्वेताने अभिनय करता करता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले.

लागीर झालं जी आणि मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस या मालिकांची तिने निर्मिती केली. या मालिका गाजल्याही. श्वेताचा जन्म साताऱ्यात झाला. पुढे शिक्षणासाठी म्हणून ती मुंबईत आली.

‘कुमकुम’, ‘घराना’ या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ या मराठी मालिकांमधून तिने दमदार अभिनय केला. मालिकांसोबतचं तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असे तिचे चित्रपट आहेत.

श्वेताने लग्न झाल्यानंतर ब्रेक घेतला होता. पुढे लक्ष्य या मालिकेतून तिने पुन्हा पडद्यावर कमबॅक केले. श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

हेदेखील वाचा-

कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा, तिघांना अटक

Mitali Mayekar : शेअर करायला गेली व्हिडिओ आणि झाली ट्रोल

Back to top button