अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप अकाऊंट; सायबर सेलला कारवाईचे निर्देश | पुढारी

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप अकाऊंट; सायबर सेलला कारवाईचे निर्देश

अकोला ; पुढारी वृत्‍तसेवा जिल्हाधिका-यांचे नाव व छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व अपरिचित नागरिकांकडे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार +856 2098392740, तसेच +91 93329 39128 या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे. अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ ‘रिपोर्ट’ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले आहे.

आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. याबाबत जिल्हाधिका-यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button