जेवण न दिल्याने लग्नाचे फोटो केले डिलिट; मित्राला शिकविला धडा

जेवण न दिल्याने लग्नाचे फोटो केले डिलिट; मित्राला शिकविला धडा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क:  (लग्नाचे फोटो केले डिलिट ) आयुष्यातील काही स्मृती अशा असतात की त्या मनाच्या कुपीत ठेवाव्या अशा… अशाच आठवणी छायाचित्रांच्या रुपाने जपल्या जातात.

मात्र, कधी कधी तंत्रज्ञान धोका देते आणि त्या आठवणी पुसून जातात. मात्र, अनेकदा अद्दल घडविण्यासाठीही त्या पुसल्या जातात.

एका लग्नसोहळ्यात फोटोग्राफरला जेवण दिले नाही म्हणून त्याने लग्नात काढलेले सगळे फोटो डिलिट करून टाकले आणि तो निघून गेला.

फोटोग्राफरने सोशल मीडियावर ही माहिती दिली असून या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.

फोटोग्राफरने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मला फोटोग्राफीचा छंद आहे. मी कुठेही फिरायला गेलो तरी तेथे फोटो काढतो.

माझ्या कुत्र्याचेही फोटो काढतो. माझ्या एका मित्राने मला लग्नात फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले.

त्यामागे त्याचा हेतू होता तो म्हणजे पैसे वाचवणे. त्याला मी प्रथम नकार दिला. मात्र, त्याने अखेर मला २५० डॉलर मानधन देण्याचे मान्य केले.

त्याच्या लग्नासाठी मी सकाळी ११ वाजता गेलो होतो. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मी फोटोग्राफी करत होतो.

टेबलवर जागाच नाही

दिवसभर काम केल्याने मला प्रचंड भूक लागली होती. तरीही पाच वाजता जेवण आले. फोटोग्राफरसाठी एकाही टेबलवर जागा ठेवली नव्हती.

मी जेवणासाठी जात असताना मला त्याने अडविले. दिवसभराच्या कामामुळे मी थकलो होतो, तरीही मला जेवण दिले नाही. साधे पाणीही मला दिले नाही. त्यामुळे मला राग आला होता.

जेवण दिले नाही ते नाही, मला थकवा आल्याने मी थोडा वेळ विश्रांती घेतो असे सांगितल्यानंतर नवरदेव मित्राने मला 'फोटो काढ अन्यथा पैसे देणार नाही' असे सांगितले.

त्यामुळे मी प्रचंड संतापलो. 'मला तुझे पैसे नकोत', असे सांगत मी सगळे फोटो डिलिट केले. मला त्याला धडा शिकवायचा होता. ( लग्नाचे फोटो केले डिलिट )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news