pimpari crime : बिल्डरने पैसे न दिल्याने ठेकेदाराची क्रेनवर चढून आत्महत्येची धमकी - पुढारी

pimpari crime : बिल्डरने पैसे न दिल्याने ठेकेदाराची क्रेनवर चढून आत्महत्येची धमकी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : pimpari crime : पिंपरी येथे बिल्डरने कामाचे पैसे न दिल्याने ठेकेदाराने क्रेनवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ही घटना वाकड येथील ‘ब्रॉडवे’ या बांधकाम साईटवर घडली.

राजनारायण रामप्रसाद चौधरी (वय ३१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकदाराचे नाव आहे. त्याच्यासह बाळासाहेब विश्वनाथ कोळी (दोघे रा. वाकड) याच्यावरही गुन्हा pimpari crime दाखल करण्यात आला आहे.

कामाचे तीन लाख न दिल्याने क्रेनवर चढला

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार- आरोपी चौधरी याच्याकडे वाकड येथील ब्रॉडवे बांधकाम साईटवरील ‘सेन्टरिंग’ कामाचा ठेका होता. दरम्यान, गुरुवारी (दि. ३०) बिल्डर ने कामाचे तीन लाख रुपये दिले नाही. असा आरोप करीत तो थेट वीस मजली उंच असलेल्या क्रेनवर चढला.

“कामाचे पैसे द्या नाही तर मी जीव देतो” अशी धमकी देत चौधरी याने गोंधळ घातला. याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कशीबशी समजूत घालून त्याला खाली उतरवले.

त्याने केलेल्या या कृत्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याला पैसे काढण्यासाठी ही आयडिया देणाऱ्या बाळासाहेब कोळी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button