विश्वास नांगरे- पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या - पुढारी

विश्वास नांगरे- पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन  : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते असही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावे. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीररित्या मला घरात कोंडून ठेवले. तेच सूचना देत होते, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दादागिरी करुन स्वत: च्या लोकांना पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार आहे. असही सोमय्या यांनी म्हटल.

माजी खासदार सोमय्या यांनी आरोपांच्या फैरी सुरुच ठेवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोल्हापूर दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील गैरव्यवहारावरून त्यांनी मुश्रीफांवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button