पेठवडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कालीदास धनवडे | पुढारी

पेठवडगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कालीदास धनवडे

पेठवडगाव; पुढारी वृत्तसेवा: पेठवडगाव येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कालीदास जयसिंग धनवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ. मोहनलाल माळी यांनी निवड घोषित केली.

येथील श्री. महालक्ष्मी मंगलधाम येथे पालिकेच्या घेण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक कालीदास धनवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ. मोहनलाल माळी यांनी धनवडे यांची बिनविरोध निवड घोषित केली. निवडीनंतर धनवडे यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका चौकात आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीस दिली ग्वाही 

दरम्यान निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष धनवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी करण्याची भावना व्यक्त केली. या मुद्दाचा धागा पकडून नगराध्यक्ष डॉ. माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या धर्तीवर लवकरच डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी कायदेशीर मान्यता व पूर्तता करण्यासाठी प्रशासकीय कामाला लागणार अशी ग्वाही दिली.

या निवडीप्रसंगी मावळते उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, संघटक अजय थोरात, नगरसेवक संतोष गाताडे, शरद पाटील, सुनीता पोळ, शबनम मोमीन, सावित्री घोटणे, मैमून कवठेकर, नम्रता ताईगडे, अलका गुरवसह प्रजापती सनदी, प्रमोद कराडे, अश्वजित पोवार, जय कराडे, प्रकाश धनवडे, विकास आयरेकर, उपस्थित होते.

अल्प कालावधी सत्कारणी लावणार…..

सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीने नगरसेवकांना सहा महिन्याचा कालावधी ठरविण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत घडलं- बिघडल या नाट्यमय घडामोडीवर नेत्यांना पडदा टाकण्यात सध्या यश आले आहे.

धनवडे यांच्या प्रतिक्रियेकडे सभागृहाचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान नूतन उपनगराध्यक्ष धनवडे यांनी मिळालेला अल्पकालावधी सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न करणार असा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

Back to top button