Bigg Boss 16: बिग बॉसधून लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर, टॉप ५ नावे समोर | पुढारी

Bigg Boss 16: बिग बॉसधून लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर, टॉप ५ नावे समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस स्पर्धक सुंबुल तौकीर खाननंतर (Bigg Boss 16) आता या शोमधून लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर गेला. या धक्कादायक एविक्शनमुळे फॅन्सना जबरदस्त धक्का लागला आहे. (Bigg Boss 16)

टीव्ही वरील कॉन्ट्रोव्हर्शियल रिॲलिटी शो ‘बिग बॉस १६’ मध्ये ग्रँड फिनालेतून ६ दिवस आधी एक धक्कादायक एविक्शन झालं. शोच्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याचसोबत शोच्या टॉप ५ कंटेस्टेंट्सची नावेदेखील समोर आली आहेत.

शोमध्ये रोज काही ना काही घडत असतं कधी भांडण तर कधी वादय आता केवळ पाच स्पर्धक घरामध्ये उरले आहेत. पाहता पाहता बिग बॉस फिनाले जवळ येत आहे. ‘बिग बॉस १६’ चा शेवटचा आठवडा सुरू आहे.

रिपोर्टनुसार, या शो ची लोकप्रिय स्पर्धक निम्रत कौर अहलुवालिया घराबाहेर गेल्याची माहिती समोर आलीय. आज ६ फेब्रुवारीला प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येईल की, आता बिग बॉस १६ च्या ट्रॉफी रेसमध्ये केवळ पाच स्पर्धक उरले आहेत. यामध्ये शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट आणि अर्चना गौतम यांच्या नावाचा समावेश आहे.

‘बिग बॉस १६’ मध्ये लाईव्ह ऑडियन्स येऊन आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट केले. यावेळी स्पर्धकांकडे ऑडियन्सशी बोलण्याचे आणि वोट देण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठीही वेळ होता. या वोटिंगने प्रियंका, शिव आणि स्टॅनने एक-एक राऊंड जिंकला. बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात कमी वोट्स निमृत कौरला मिळाले होते.

Back to top button