Kiara-Sidharth wedding update : कियारा-सिद्धार्थचे ६ ला नव्हे तर 'या' तारखेला लग्न होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काही वर्षे डेटिंगनंतर आता लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथे हा लग्नसोहळा पार पडणार आहे. (Kiara-Sidharth wedding update) लेटेस्ट अपडेट्सनुसार, या कपलचे ६ ला नव्हे तर ७ तारखेला लग्न होणार असून आज प्री-वेडिंग कार्यक्रम असतील. संगीत सोहळ्याची संपूर्ण तयारी झालीय. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आज सूर्यगढ पॅलेस हॉटेलमध्ये रविवारी मेहंदीचा कार्यक्रम झाला. दरम्यान, शाहिद कपूर, करण जोहर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा लग्नस्थळी पोहोचले आहेत. (Kiara-Sidharth wedding update)
एका रिपोर्टनुसार, संगीत सेरेमनीमध्ये हिंदी गाणी वाजणार असून त्यामध्ये काला चष्मा, बिजली, रंगिसारी, डिस्को दिवाने, नच दे सारे अशी गाणे प्लेलिस्टमध्ये आहेत. कियाराचा भाऊ मिशाल एक गायक आणि संगीतकार आहे. त्याने एक स्पेशल ट्रॅक बनवल्याचे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
लग्नाची सर्व सुरक्षा तीन एजन्सीकडे देण्यात आलीय. एक एजन्सी शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड चालवतो. हॉटेलमध्ये या एजन्सीचे १०० हून अधिक गार्ड तैनात असतील. त्यांच्याकडे लग्नात येणाऱ्या जवळपास १५० पाहुण्यांची सुरक्षेची जबाबदारी असेल.
डीजे गणेशकडे संगीत सोहळ्याची जबाबदारी
मीडिया रिपोर्टनुसार, डीजे गणेशकडे संगीताची जबाबदारी देण्यात आली असून तो जैसलमेर विमानतळावर स्पॉट झाला होता. तसेच उत्सव मल्होत्रा आमि कामना अरोरा हे या कार्यक्रमाचे कोरिओग्राफर असतील.
दरम्यान, या लग्नात सलमान खान हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आलीय.
(video- video- kiaraadvanixbengal, varindertchawla, viralbhayani insta वरून साभार)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram