ED : आनंदराव अडसूळांना ईडीची नोटीस, अडसूळ स्‍ट्रेचरवरुन रुग्‍णालयात | पुढारी

ED : आनंदराव अडसूळांना ईडीची नोटीस, अडसूळ स्‍ट्रेचरवरुन रुग्‍णालयात

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीची (ED) नोटीस आली असून त्यांना चौकशी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यातून पुन्हा एकदा आमदार रवी राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्या संघर्ष समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपासून हा संघर्ष सुरू असून आमदार रवी राणा यांनी ईडीकडे सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार दिलेली होती.

आनंदराव अडसूळ यांची तब्‍येत बिघडली

आज सकाळी ८ च्या सुमारास अडसूळ यांना ईडीने (ED) समन्स पाठवले आहेत. तसंच चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे अशी सूचनाही करण्यात आली होती. ईडीने बजावलेल्या या समन्सवर अडसूळ यांनी सांगितलं आहे की, आधीच नियोजित असलेल्या कार्यक्रमांमुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे अडसुळांनी स्पष्ट केले हाेते. मात्र मुंबइईतील कांदिवली पूर्वमधील त्‍यांच्‍या घरात ईडीचे पथक दाखल झाले.  या वेळी  आनंदराव अडसूळ यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना स्‍ट्रेचरवरुन रुग्‍णालयात हलविण्‍यात आले आहे.

आमदार रवी राणा यांनी ईडीने आनंदराव अडसूळांना समन्स बजावल्यानंतर अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिली होती. पण, आनंदराव अडसूळ यांना कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असं आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी स्पष्ट केले हाेते.

काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चा फेटाळून लावत, त्यांनी आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली होती.

सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनेही याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने या महिन्याच्या सुरुवातीलाच याप्रकरणाशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करून काही कागदपत्रांसह महत्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता ईडीने अडसुळाना चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले आहे.

पहा व्हिडीओ : बासरीची धून गुंजतेय बावधनच्या टेकडीवर

Back to top button