खतरों के खिलाडी-११ : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानी विजेता - पुढारी

खतरों के खिलाडी-११ : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानी विजेता

पुढारी ऑनलाईन : खतरों के खिलाडी-११ चा प्रीमियर १७ जुलैला झाला होता. रविवारी रात्री (२६ सप्टेंबर) हा शो संपला. कलर्स टीव्हीवरील या ॲडव्हेंचर्स रिॲलिटी शोचा विजेता एक अभिनेता आणि अँकर झाला आहे. खतरों के खिलाडी-११ चा विजेता अर्जुन बिजलानी झाला आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत असणाऱ्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत त्याने या शोची ट्रॉफी आपल्या नावे केलीय.

दिव्यांका त्रिपाठीसोबत विशाल आदित्य सिंह त्याचे प्रतिस्पर्धी होते. दिव्यांका त्रिपाठी उपविजेती ठरली.

कोण आहे अर्जुन बिजलानी ?

स्टंट बेस्ड रिॲलिटी शोचा निकाल आल्यानंतर फॅन्स काहीसे आश्चर्यचकित झाले. कारण, शोचा जो निकाल समोर आला, ते पाहून वाटत नव्हतं की, अर्जुन जिंकेल. दिव्यांका त्रिपाठी जिंकण्यापासून केवळ एक पाऊल मागे राहिली.

अर्जुन बिजलानीने ‘मिले हम तुम’ आणि ‘नागिन’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम कलंय. अर्जुनने संपूर्ण शोमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. फिनालेच्या दिवशी अर्जुनचा सामना दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंहसी होता. अर्जुनने त्यात बाजी मारली. बिजलानीला शोची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांसोबत एक कार मिळाली आहे.

रोहित शेट्टीने केलं होतं कौतुक

अर्जुनचे कौतुक स्वत: शोचे होस्ट रोहित शेट्टीनेदेखील केली होते. रोहित म्हणाला होता, अर्जुन नेहमी आपला टास्क शांततेने कम्प्लीट करतो. तो न गोंधळ घालतो न जिंकल्यानंतर दिखावा करतो. टास्क संपवतो आणि आपल्या जागेवर परत येतोत. प्रत्येकवेळी त्याने चांगले प्रदर्शन केले आहे.

अंतिम सामन्यात टॉप-५ कंटेस्टेंट्स पोहोचले होते. यामध्ये अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंह आणि श्वेता तिवारी यांची नावे होती. अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीने आधीपासूनचं अर्जुनला विजेता असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bijlani (@arjunbijlani)

Back to top button