बीड : धारूरमध्ये दोघे पुरात वाहून गेले | पुढारी

बीड : धारूरमध्ये दोघे पुरात वाहून गेले

बीड; पुढारी वृत्‍तसेवा : बीड जिल्‍ह्यात पावसाचा जोर सुरूच आहे. यामुळे जिल्‍ह्यातील नदी, नाल्‍यांना पूर आला आहे. दरम्‍यान, काल (रविवार) रात्री केज तालुक्यातील चिंचपूर येथील कामठ नावाच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोनजण वाहून गेल्‍याची घटना घडली.

महादेव सोनवणे, उत्तम सोनवणे असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोघे पुरात वाहून गेले ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

तालुक्यातील चिंचपूर येथे दुचाकीवरून ओढा ओलांडत असताना दोघेजण पुरात वाहून गेल्‍याची घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना रविवारी (दि.26) रात्री घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Back to top button