New Parliament बांधकामाच्या ठिकाणी पंतप्रधानांची अचानक भेट - पुढारी

New Parliament बांधकामाच्या ठिकाणी पंतप्रधानांची अचानक भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचा दौरा संपविल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ८.४५ वाजता दिल्लीत बांधण्यात येत असलेल्या नव्या संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या (New Parliament) ठिकाणी भेट दिली. जवळजवळ १ तास या ठिकाणी त्यांनी घालविला आणि वैयक्तिकरित्या त्यांनी बांधकामाची पाहणी केली.

कामाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पोहोचले होते. बांधकामाची पाहणी करत असतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये पांढरा रंगाचे सुरक्षा हेल्मटे घालून बांधकामांची पाहणी करत आहेत. पंतप्रधान येणार आहे, याची कोणालाच पूर्वकल्पना नव्हती. अचानक त्यांनी साईट व्हिजीट केली.

अमेरिका दौऱ्यातील ६५ तासांत किमान वीस बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्या आहेत. एकूण तीन दिवस ते अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिकेतून परतताना विमानातही त्यांनी चार प्रदीर्घ बैठका घेतल्या, अशी माहिती सूत्रांकडून माध्यमकर्मींना मिळाली.

नव्या संसदेबद्दलची माहिती

ही नव्या संसदेची इमारत (New Parliament) सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधली जात आहे. प्रकल्पाअंतर्गत नव्या इमारतींच्या बांधकामासाठी मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत. या इमारतीसाठी सुमारे १००० कोटी रुपये खर्च केले जातील. ६४५०० चौ. मी. च्या क्षेत्रात नवीन इमारत बांधली जात आहे. इतकंच नाही तर, जुन्या इमारतीपेक्षा १७ हजार चौरस मीटर मोठी असेल. पुढील वर्षांपर्यंत ही इमारत बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

पहा व्हिडीओ : ‘एक थी बेगम’ फेम शाहब अलीने पत्रकारिता का सोडली?

Back to top button