Congress : कन्हैया कुमारचे काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन | पुढारी

Congress : कन्हैया कुमारचे काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ‘बिहार से तिहार तक’ या पुस्तकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि गुजरातमधील युवा नेते जिग्नेश मेवानी हे येत्या २ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्यावर बिहारमध्ये मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन आणि विद्यार्थी चळवळीमुळे कन्हैयाकुमार यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी काही काळ भाकपमध्ये काम केले. मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कन्हैयाकुमार आणि मेवानी यांनी काँग्रेसमध्ये यावे म्हणून तहसीन पूनावाला यांनी गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी घालून दिल्या होत्या. अखेरीस दोघांचाही काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याचा निर्णय झाला.

आपल्या पुस्तकाच्या निमित्ताने कन्हैयाकुमार भारतात अनेक ठिकाणी फिरले. विविध न्यूज चॅनलवर काँग्रेसची बाजू मांडणारे तहसीन पूनावाला यांनी कन्हैयाकुमार यांना तीनेक वर्षांपूर्वी पुण्यातही निमंत्रित केले होते. त्यांची जुनी मैत्री पुढे कन्हैयाकुमार यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग बनली आहे.

पंजाबातील राजकीय नाट्यावेळीही प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू दिल्लीत आले तेव्हा पूनावाला यांच्या घरीच थांबले होते, असे पूनावाला यांच्या घनिष्ठ मित्रांकडून समजते. माध्यमांना टाळण्यासाठी सिद्धू यांनी या मार्ग निवडला होता.

पहा व्हिडीओ : ‘एक थी बेगम’ फेम शाहब अलीने पत्रकारिता का सोडली? 

Back to top button