CSK vs KKR : अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा रोमांचक विजय!, केकेआरवर २ विकेट्सने मात - पुढारी

CSK vs KKR : अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा रोमांचक विजय!, केकेआरवर २ विकेट्सने मात

अबुधाबी; पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामाच्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) 2 गडी राखून पराभव केला. रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. या विजयासह सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहे.

दरम्यान, कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत केकेआरने २० षटकांत ६ गडी गमावून १७१ धावा केल्या. चेन्नई संघासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान होते. चेन्नईने ८ गडी गमावून १७५ धावा केल्या आणि केकेआरवर दोन विकेट्स राखून विजय मिळवला. विजयाबरोबर चेन्नई पॉइंट टेबलमध्ये टॉपवर पोहचली आहे.

Chennai vs Kolkata, 38th Match – Live

चेन्नईने कोलकातावर रोमांचक विजय मिळवला आहे. CSK ला १ चेंडूमध्ये १ धावा करायच्या होत्या. दीपक चाहर क्रीजवर होता. आणि समोर सुनील नरेन गोलंदाजी करत होता. चाहरने लेग साईडवर शॉट खेळून संघाला मोठा विजय मिळवून दिला.

२० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावून चेन्नईचा केकेआरवर २ विकेटने विजय

१९.५ व्या षटकात ६ बाद १७१, विजयाला १ धाव आवश्यक होती

१२ व्या षटकात ५ धावा वसूल केल्या, CSK 106-2

फर्गुसनने डु प्लेसीला ४३ (३०) बाद केले.

मोईन अली आणि डु प्लेसी यांनी दुस-या विकेटसाठी २८ (१९) धावांची भागिदारी केली.

११.३ व्या षटकात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फाफ डु प्लेसी बाद झाला.

११ व्या षटकात १२ धावा वसूल, CSK 101-1

१० व्या षटकात ११ धावा वसूल, CSK 89-1

९ व्या षटकात १० धावा वसूल; CSK 78-1

फाफ-ऋतुराज यांच्या सलामीवीर जोडीने सध्याच्या IPL 2021 सीझनमध्ये पाचव्यांदा ५० + धावांची भागिदारी केली आहे.

ऋतुराजने २८ चेंडूत ४० धावा केल्या.

९ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर रसेलने ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली. मॉर्गनने त्याचा झेल पकडला.

चेन्नईला ७४ धावसंख्येवर पहिला झटका बसला.

आठव्या षटकात चेन्नईला फक्त ५ धावा मिळवता आल्या, CSK 68-0

सातव्या षटकात ऋतुराजचा नरीनला षटकार; ११ धावा केल्या वसूल, CSK 63-0

IPL 2021 मध्ये फाफ डु प्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी एकूण ५०२* धावांच्या भागिदारीचा टप्पा पूर्ण केला.

सहाव्या षटकात १० धावा वसूल, CSK चे अर्धशतक पूर्ण, CSK 52-0

पाचव्या षटकात १४ धावा वसूल; ऋतुराजने नरीनला चौकार-षटकार ठोकले, CSK 42-0

चौथ्या षटकात दोन चौकारांसह १० धावा वसूल, CSK 28-0

तिस-या षटकात फटकेबाजी; ९ धावा वसूल, CSK 18-0

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसची संयमी खेळी

दुसरे षटक : CSK 9-0

पहिले षटक : CSK 5-0

पहिले षटक : चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस मैदानात

नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआर संघाला १० धावांच्या एकूण धावसंख्येवर पहिला धक्का बसला. अंबाती रायुडूच्या अचूक थ्रोमुळे शुभमन गिल ९ धावांवर धावबाद झाला. शार्दुल ठाकूरने CSK ला दुसरे यश मिळवून दिले. त्याने व्यंकटेश अय्यरला १८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धोनीकडे झेलबाद केले. केकेआरला तिसरा धक्का कर्णधार इऑन मॉर्गनच्या रूपात बसला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. तो जोश हेझलवूडचा बळी ठरला. त्याचा झेल फाफ डु प्लेसिसने पकडला.

शुभमन गिलच्या विकेटनंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी जबाबदारी सांभाळली आणि दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. अय्यर हळूहळू आक्रमक होत होता; पण नंतर शार्दुल ठाकूरने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरची (१८) विकेट घेतली, ज्यामुळे चेन्नईला दुसरा झटका बसला. अय्यरच्या विकेटनंतर, इऑन मॉर्गन देखील काही विशेष कमाल दाखवू शकला नाही. जोश हेझलवूडने १४ चेंडूत ८ धावांवर त्याला माघारे धाडले. फाफ डू प्लेसिसने बाऊंड्री लाईनवर कॅप्टन मॉर्गनचा शानदार झेल पकडला.

केकेआरने शेवटच्या ३ षटकांत ४४ धावा वसूल केल्या. पण आंद्रे रसेलची जादू दिसली नाही. तो २० धावा केल्यावर बाद झाला. पण दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत ११ चेंडूत २६ धावा केल्या. नितीश राणानेही २७ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली.

शुभमन पहिल्याच षटकात बाद

सामन्याच्या पहिल्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलने चौकार ठोकला. मात्र दीपक चाहरने पाचव्या चेंडूवर शुभमनला चकवले आणि एलबीडब्ल्यूचे अपिल केले. पंचांनी चाहरच्या बाजूने निर्णय देत शुभमनला बाद घोषित केले. मात्र शुभमनने रिव्ह्यू घेतला. निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला. शुभमन गिल नाबाद ठरला. पण सहव्या चेंडूवर शुभमन धावबाद झाला. त्याने पाच चेंडूत ९ धावा केल्या.

KKR : शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इओन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रणंद कृष्णा.

CSK – फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, सॅम कुरान, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवूड.

Back to top button